पैठण, (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या ९ गट, १८ गणासाठी ३०६ मतदान केंद्रावरसकाळी साडेसात वाजेपासून शांततेत मतदान सुरू झाले. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत कुठेही अनुचित प्रकार न घडल्याची माहिती आहे.
खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी पाचोड येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १७.५० टक्के मतदान झाले असून यामध्ये पुरुष १९.३२ तर १५.५२ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण २ लाख ४७ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.














